TSK

TSK · यश 34:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.

ज्यावेळेस माझी स्वर्गीय तलवार रक्ताने माखेल, पाहा, ती आता अदोमावर उतरली आहे, ज्या लोकांचा समूळ नायनाट करण्याचे मी ठरविले आहे त्यांच्यावर ती उतरेल.

“मी एकट्यानेच द्राक्षकुंड तुडवले आहे आणि राष्ट्रांतील कोणी माझ्याबरोबर नव्हता. मी आपल्या रागाने त्यांना तुडवले आणि आपल्या क्रोधाने त्यांना रगडले. त्यांचे रक्त माझ्या कपड्यांवर उडाले आणि माझी सर्व कपडे मळीन झाली आहेत.

परमेश्वर म्हणतो, “कारण मी आपलीच शपथ वाहिली आहे की, बस्रा दहशत, निंदा, उध्वस्त, आणि शापासाठीचा विषय होईल. ते शहर पडझड झालेल्या दगडांची रास होईल. त्यांची सर्व नगरे कायमची उध्वस्त होतील.”

“मी त्यांना कोकरासारखे, मेंढे व बोकड यांच्यासारखे खाली कत्तल करण्यास घेऊन जाईन.

मारुन टाकण्यासाठी हत्याराला धारधार करा; तिला चकाकीत करा; आमच्या पुत्राच्या राजदंडाचा आम्ही उत्सव करु? जी तलवार येईल ती सर्व दंडाला कमी लेखते.

तुम्ही योद्ध्यांचे मांस खाल आणि पृथ्वींचे अधिपति मेंढ्या, कोकरे, बोकड व बैल यांचे रक्त प्याल; ते सर्व बाशानात पुष्ट झालेले आहेत.

¶ आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या भोजनासाठी जमा व्हा;