अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.
TSK
TSK · यश 35:10
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मग आमचे मुख हास्याने, आणि आमची जीभ गायनाने भरली. नंतर ते राष्ट्रांमध्ये म्हणू लागले; परमेश्वराने ह्यांच्यासाठी महान गोष्टी केल्या आहेत.
कारण यरूशलेम येथे सियोनेत लोक राहतील आणि तू पुन्हा कधीही रडणार नाहीस. खचित तो तुझ्या रडण्याचा आवाज होताच तुझ्यावर दया करील, जेव्हा ते ऐकल, तो तुला उत्तर देईल.
परमेश्वराचे खंडून घेतलेले आनंदाअश्रूने सियोनास परत येतील आणि त्यांच्या माथ्यांवर सर्वकाळचा हर्ष राहील, ते आनंद व हर्ष पावतील, शोक व उसासे पळून जातील.
“तुझ्या अपमाना ऐवजी तुला दुप्पट मिळेल, आणि तुझ्या अप्रतिष्ठेच्या ऐवजी ते आपल्या विभागाविषयी आनंद करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट भाग पावतील, सर्वकाळचा आनंद त्याना प्राप्त होईल.”
“मी यरूशलेमविषयी हर्ष आणि माझ्या लोकांविषयी आनंद करेन सुखी होईन.” तिच्यात आक्रोश व रडणे पुन्हा ऐकू येणार नाही.
मग ते येतील आणि सियोनेच्या शिखरावर आनंदाने गातील. परमेश्वराच्या चांगुलपणामुळे धान्यासाठी आणि द्राक्षरसासाठी, तेलासाठी, आणि थवा व कळपांची संततीसाठी आनंदित होऊन येतील. त्यांचा जीव भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे होईल. यापुढे ते पुन्हा कधी दुःखीत होणार नाहीत.
‹म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”›
त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.
¶ या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.
¶ मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते.
¶ या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली हालेलूया, तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,