TSK

TSK · यश 41:14

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वराने प्रेमाने तुम्हासच का निवडले? तुम्ही एखाद्या मोठ्या राष्ट्रातील होता म्हणून नव्हे. उलट तुम्ही संख्येने सगळ्यात कमी होता.

माझा तारण करणारा जिवंत आहे याची मला खात्री आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील.

माझ्या तोंडचे शब्द आणि माझ्या हृदयाचे विचार तुझ्यासमोर मान्य असोत. परमेश्वरा, तू माझा खडक आहेस, मला तारणारा तूच आहेस.

परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.

परमेश्वर, तुमचा उद्धारक, इस्राएलाचा पवित्र प्रभू म्हणतो, कारण मी तुझ्यासाठी बाबेलला निरोप पाठवीन आणि त्या सर्वांना खाली फरार करीन, खास्द्यांचे हर्षाचे अविर्भाव विलापगीतात बदलेल.

तुझा उद्धारक, ज्याने तुला गर्भावस्थेपासून घडवले तो परमेश्वर, ज्याने सर्वकाही निर्माण केले, जो एकटा आकाश पसरतो, ज्या एकट्याने पृथ्वी तयार केली तो म्हणतो मीच परमेश्वर आहे.

जो तुझा खंडून घेणारा, इस्राएलचा पवित्र परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वर तुझा देव, जो तुम्हास यशस्वी होण्यासाठी शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यामध्ये जो तुला चालवतो.

“मी तुझ्या पीडणाऱ्यांना त्यांचेच मांस खायला लावीन, आणि जसे नव्या द्राक्षरसाने तसे ते स्वत:च्याच रक्ताने मद्यधुंद होतील. आणि सर्व मनुष्य जाणतील की, मी परमेश्वर, तुझा तारणारा आहे, आणि याकोबाचा समर्थ तुझा खंडणारा आहे.”

मी रागाच्या भरात क्षणभर आपले तोंड तुजपासून लपवले; पण मी सर्वकाळच्या कराराच्या विश्वासाने मी तुझ्यावर दया करीन. असे परमेश्वर, तुझा तारणहार म्हणतो.

तू राष्ट्रांचे दुध पिणार आणि राजांचे स्तन चोखणार, मग तुला समजेल की परमेश्वर तुझा देव, तुला सोडवणारा आणि तारणारा, याकोबाचे सामर्थ्य आहे.

त्यांचा उद्धारकर्ता समर्थ आहे; ‘सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाव आहे’ तो खचित त्यांचा वाद चालवील, म्हणजे मग तो देशास विसावा देईल व बाबेलाच्या रहाणाऱ्यावर संघर्ष आणील.”

‹पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.›

¶ यशयादेखील इस्राएलाविषयी ओरडून म्हणतो की, ‘इस्राएलाच्या पुत्रांची संख्या जरी समुद्राच्या वाळूसारखी झाली, तरी एक अवशेष वाचवला जाईल.

आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.