TSK

TSK · यश 45:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. मी तुला जीवे मारीन आणि तुझे मस्तक छेदिन आणि पलिष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील वनपशू यांस देईन. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की, इस्राएलामध्ये परमेश्वर आहे.

नंतर तू, मात्र तूच परमेश्वर, या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळेल.

तर आता, हे परमेश्वरा, आमच्या देवा, आम्हास त्यांच्या हातातून सोडीव, म्हणजे तूच मात्र परमेश्वर आहेस हे पृथ्वीतल्या सर्व राजांनी जाणावे.

ह्याप्रकारे पश्चिमेपासून ते परमेश्वराच्या नावाचे भय धरतील, आणि सुर्याच्या उदयापासून त्याच्या प्रतापाचे भय धरतील. कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे येतील तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्यांच्याविरुद्ध झेंडा उभारिल.

“मी आपले वैभव राष्ट्रामध्ये ठेवीन आणि माझा न्याय मी केला आहे तो आणि माझा हात मी त्यांच्यावर ठेवला आहे तोही ते सर्व राष्ट्रे पाहतील.

“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.