TSK

TSK · यश 46:11

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

“पारसाचा राजा कोरेश म्हणतो, स्वर्गातील परमेश्वर देवाने पृथ्वीवरील सर्व राज्ये मला दिली आहेत आणि यहूदातील यरूशलेमात त्याचे मंदिर बांधण्यासाठी त्याने मला निवडले आहे.

खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय, तुला स्तुती मिळवून देईल. तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे.

सीयोन डोंगर व यरूशलेम यासंबंधीचे आपले कार्य संपले तेव्हा प्रभू म्हणेल, अश्शूरच्या राजाच्या उन्मत्त हृदयाचे भाषण व त्याच्या गर्वीष्ठ दृष्टीला मी शिक्षा करीन.

सेनाधीश परमेश्वराने शपथ वाहून म्हणाला, खात्रीने, माझे जे उद्देश आहेत, त्याप्रमाणे होईल; आणि जसे मी योजले तसेच होईल.

जेव्हा तो रथ, घोडेस्वार, गाढवावर बसलेले, उंटावर बसलेले पाहील, तेव्हा त्याने सतर्क व सावधान असायला हवे.

मी काय बोलू? त्याने दोन्ही केले, तो माझ्याशी बोलला आणि त्याने ते केले आहे; मी आपल्या जीवनात हळूहळू चालेल कारण माझ्या जिवाला खूप क्लेश झाले.

“मी उत्तरेपासून एकाला उठविले आहे आणि तो आला आहे; तो सूर्याच्या उगवतीपासून जो माझ्या नावाने हाक मारतो त्यास मी बोलावून घेतो, आणि तो चिखलाप्रमाणे सत्ताधाऱ्यास तुडविल, जसा कुंभार चिखल पायाखाली तुडवतो तसा त्यांना तुडविल.”

मीच न्यायीपणाने कोरेशाची उठावणी केली आहे आणि मी त्याचे सगळे मार्ग सपाट करील. तो माझे नगर बांधील; आणि काही मोल किंवा मोबदला न घेता माझ्या बंदिवान झालेल्या लोकांस घरी जाण्यास सोडून देईल. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

“बाबेलाविरूद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या. त्यांच्याविरुद्ध तळ द्या आणि कोणालाही निसटू देऊ नका. तिने जे काही केले त्याची परतफेड करा. तिने जे माप वापरले तिला तसेच करा. कारण तिने परमेश्वरास, इस्राएलाचा पवित्र प्रभू याची अवज्ञा केली.

तर बाबेलाविरूद्ध परमेश्वराने जी योजना ठरवली आहे ती, खास्द्यांच्या देशाविरूद्ध जे संकल्प केले आहेत तेही ऐका; ते खचित कळपातील लहानांनादेखील, ओढून नेतील, त्यांचे कुरणाचे देश नाशाची जागा होईल.

तू इस्राएलाच्या पर्वतांवर तू, तुझे सर्व समुदाय, व तुझ्याबरोबरचे जे कोणी सैन्य आहे ते, मरून पडशील. मी तुम्हास पक्ष्यांचे व रानातील वन्य पशूंचे भक्ष्य करीन.

परंतु ते देवाचे असल्यास तुम्हास ते नष्ट करता यावयाचे नाही, तुम्ही मात्र देवाचे विरोधी ठराल.”

देवाच्या सर्वकाळच्या हेतुला अनुसरून जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्ण केले आहे.