TSK

TSK · यश 47:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ईयोबाने स्वतःचे अंग खाजविण्यासाठी खापराचा तुकडा घेतला आणि तो राखेत जाऊन बसला.

कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.

हे बाबेलाच्या कन्ये, तू लवकरच ओसाड पडणार आहेस, कारण जसे तू आम्हास केले तसे, जो तुला परत करील तो आशीर्वादित आहे.

¶ आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.

¶ परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील.

मी मेघाच्या उंचीच्यावरती चढेन; मी परात्पर देवासारखा होईन.’

तो म्हणतो, “हे कलंकीत भ्रष्ट झालेली सीदोन कन्ये तू येथून पुढे आनंदीत होणार नाहीस, उठ, सायप्रस पार कर, पण तेथेही तुला आराम मिळणार नाही.”

तुम्ही ज्या निर्धास्तपणे राहणाऱ्या स्त्रियांनो उठा, आणि माझी वाणी ऐका; अहो निश्चिंत कन्यांनो, माझे ऐका.

तू म्हटले, मी त्यांच्यावर सर्वोच्च राणीप्रमाणे चिरकाल राज्य करीन. म्हणून तू यागोष्टी मनात घेतल्या नाहीत, किंवा यांचा परिणाम लक्षात घेतला नाही.

राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.

अगे तू दीबोनात राहणाऱ्या कन्ये, तू आपल्या मानाच्या जागेवरून खाली ये आणि कोरड्या जमिनीवर बस. कारण मवाबाचा विनाश करणारा तुझ्यावर आला आहे तो तुझे बालेकिल्ले नष्ट करील.

परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी बाबेलावर आणि लेब-कामाईत जे कोणी राहतात त्यांच्याविरुद्ध विध्वंसक वाऱ्याने खळबळ उडवीन.

“आम्ही अपमान ऐकला आहे, म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत. लाजेने आमची तोंडे झाकली आहेत, कारण परमेश्वराच्या घरातील पवित्र स्थानात परक्यांनी प्रवेश केला आहे.”

तरुण आणि वृध्द असे दोघेही रस्त्यात भूमीवर कसे पडले आहेत. माझे तरुण व तरुणी तलवारीने पडले आहेत; तू आपल्या क्रोधाच्या दिवशी त्यांच्यावर कसलिही दया केली नाही तर त्यांना निर्दयपणे मारलेस.

कारण समुद्रातले सर्व प्रमुख आपल्या सिंहासनावरून खाली उतरतील आणि आपले झगे बाजूला काढून ठेवतील आणि आपले रंगीबेरंगी वस्त्रे काढून टाकतील. ते स्वतःला भीतीच्या वस्त्राने आच्छादतील आणि भीतीने जमिनीवर बसतील व वारंवार कांपतील आणि तुझ्याविषयी भयचकीत होतील.

¶ जो तू खडकाच्या कपारीत उंच स्थानी आपल्या घरात राहतोस, तू आपल्या मनात म्हणतोस, मला खाली जमिनीवर कोण आणू शकेल? या तुझ्या मनाच्या गर्वाने तुला फसवले आहे.

मी राज्यांचे सिंहासन उलथवून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन! मी त्यांच्या रथांना व सारथ्यांना उलथून टाकीन. त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येकजण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.

तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.