TSK

TSK · यश 6:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

नगरात अजून असलेले लोक बाबेलाच्या राज्याकडे फितून गेलेले लोक व उरलेले लोक यांना गारद्यांचा नायक नबूजरदानाने ताब्यात घेतले आणि त्यांच्यापैकी जे शरण यायला तयार होते त्यांच्यासह सर्वांना कैदी म्हणून नेले.

हे परमेश्वरा, तू राष्ट्र वाढवले आहेस, तू राष्ट्र वाढवले आहे, तू सन्मानीत आहेस, तू भूमीच्या सर्व सीमा विस्तारित केल्या आहेत.

“मी माझे घर सोडले आहे, मी माझे वतन टाकले आहे. मी माझे प्रिय लोक तिच्या वैऱ्यांच्या हाती दिले आहे.

¶ नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले.

¶ तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे.