TSK

TSK · यश 62:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.”

आपल्या पित्याच्या सूचना शलमोनाने तंतोतंत पाळल्या परमेश्वराच्या सेवेसाठी त्याने याजकवर्गाच्या नेमणुका केल्या लेवींना त्यांची कामे पार पाडायला नेमले. स्तुतिगीते म्हणणे आणि मंदिराच्या चाकरीतील रोजची सेवाकार्ये बजावण्यात याजकांना मदत करणे ही लेवीची कामे होती. याखेरीज शलमोनाने प्रत्येक प्रवेशद्वाराशी द्वारपालांच्या गटांच्या नेमणुका केल्या. परमेश्वरास मानणाऱ्या दाविदाने अशाच सूचना दिल्या होत्या.

हे परमेश्वरा, वैऱ्याने तुझ्याकडे अपमान भिरकावला आहे; आणि मूर्ख लोकांनी तुझ्या नावाची निंदा केली आहे त्याची आठवण कर

शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले. मी त्यांना विचारले, “माझ्या प्राणप्रियाला तुम्ही पाहिलेत का?”

जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड.

त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.

रणशिंगाचा आवाज ऐकायला तुमच्यावर मी रखवालदार नियूक्त केले. पण ते म्हणाले, आम्ही ऐकणार नाही.

“मानवाच्या मुला, तुझ्या लोकांशी बोल त्यांना सांग की, जेव्हा मी कोणत्याही देशाविरूद्ध तलवार आणीन, तेव्हा त्या देशाचे लोक आपल्यातील एका मनुष्यास घेतात आणि त्यास आपल्यासाठी पहारेकरी करतात.

¶ मग येशू त्यास म्हणाला, ‹“समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, ›

जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!”

तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तू तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो.

आणि त्याने स्वतःच काही लोकांस प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक असे दाने दिली.

¶ आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशोब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.

ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस?”