TSK

TSK · यश 63:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तो त्याचा तरुण घोडा द्राक्षवेलीस, आणि त्याचे शिंगरु खास द्राक्षवेलीस बांधेल. त्याने त्याचे वस्त्र द्राक्षरसात आणि आपला झगा द्राक्षांच्या रक्तात धुतला आहे.

बेलाच्या निधनानंतर जेरहचा पुत्र योबाब राजा झाला. योबाब बस्रा येथील होता.

हे बलवाना, तू आपली तलवार मांडीला बांध, आपले वैभव आणि आपला प्रताप धारण कर.

कारण तू आपल्या सामर्थ्याने कंबर बांधून, पर्वत दृढ केले आहेत.

(ती तरुणी स्वतःशीच बोलते) गंधरस व ऊद व्यापाऱ्याकडील सर्व चूर्णानी सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने अशी धुराच्या खांबासारखी, रानातून येणारी ती ही कोण आहे?

(यरूशलेमेतील स्त्री बोलते) आपल्या प्रियकरावर टेकत रानातून येणारी ही स्त्री कोण आहे? (ती तरूण स्त्री आपल्या प्रियकराशी बोलते) मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, तेथे तुझ्या आईने तुझे गर्भधारण केले, तेथे तिने तुला जन्म दिला, ती तुला प्रसवली.

तुम्ही राष्ट्रांनो, जवळ या व ऐका; तुम्ही लोकांनो, लक्ष द्या! पृथ्वी व तीने भरलेल्या, जग आणि त्यातून येणाऱ्या सर्व गोष्टी ऐकोत.

¶ पाहा, माझा सेवक, ज्याला मी उचलून धरतो; माझा निवडलेला, याच्या विषयी माझा जीव आनंदीत आहेः मी आपला आत्मा त्याच्याठायी ठेवीन; तो राष्ट्रावर न्याय आणील.

मी एकटेपणात, गुप्त जागी कधी बोललो नाही; तुम्ही व्यर्थ जागी मला शोधा असे मी याकोबाच्या वंशाना कधीही सांगितले नाही. मी परमेश्वर आहे, जो प्रामाणिकपणे बोलतो; रास्तगोष्टी घोषणा करणारा आहे.

तुझी वस्त्रे लालभडक का? आणि ती का द्राक्षांचा रस काढण्याऱ्याच्या कपड्यासारखी आहेत?

परमेश्वर असे म्हणतो, “अदोमाच्या तिन्ही पापांबद्दल, अगदी चारहींमुळे, मी त्यांना शिक्षा करण्यापासून फिरणार नाही. कारण अदोमाने तलवार घेऊन त्याच्या भावाचा पाठलाग केला. आणि त्याने सर्व दयाशीलपणा काढून टाकला. त्याचा क्रोध कायम राहिला, आणि त्याने आपला राग सतत बाळगला.

जेव्हा येशूने यरूशलेम शहरामध्ये प्रवेश केला तेव्हा संपूर्ण शहर गजबजून निघाले व लोक विचारत होते, “हा कोण आहे?”

म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

¶ आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे

त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि देवाचा शब्द हे नाव त्यास देण्यात आले आहे;