TSK

TSK · यश 7:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर याच्याकडे आहाजने दूतामार्फत संदेश पाठवला की, “मी तुझा दास व तुझा मुलगा आहे. अराम आणि इस्राएलचे राजे माझ्यावर चाल करून आले आहेत. तेव्हा माझ्या मदतीला वर ये आणि मला वाचव.”

तिल्गथ-पिल्नेसर हा अश्शूराचा राजा. याने आहाजला मदत करण्याऐवजी त्रासच दिला.

म्हणून प्रभू लवकरच त्यांच्यावर नदीच्या जलांचा मोठा व शक्तीशाली लोंढा, म्हणजेच अश्शूरच्या राजाला त्याच्या सर्व वैभवाने त्यांच्यावर आणील. तो आपले सर्व पाट व कडा भरुन वाहील.

म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.

कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.

पाहा परमेश्वर पृथ्वीला ओसाड व रिकामी करीत आहे, तो त्यातील राहणाऱ्यांची पागांपांग करीत आहे.

म्हणून आता, मी सर्व देश बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर, माझा सेवक ह्याच्या हाती दिले आहेत. त्याची सेवा करायला मी वन्य प्राणीसुद्धा दिले आहेत.

“मानवाच्या मुला, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर याने सोरेस वेढा दिला तेव्हा त्याने आपल्या सैन्याला सोरविरूद्ध कठीण परिश्रम करायला लावले. प्रत्येक डोक्याची हजामत केली होती आणि प्रत्येक खांद्याची सालटी निघाली होती पण त्याने जे कठीण परिश्रम सोरेविरूद्ध केले त्यामुळे त्यास व त्याच्या सैन्याला सोरेतून कधीही काही वेतन मिळाले नाही.”