त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत आणि त्यांचे धनुष्ये वाकलेली आहेत. त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे आहेत आणि त्यांच्या रथाचे चाक वादळा प्रमाणे आहेत.
TSK
TSK · यिर्म 4:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे; मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.
त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”
माझी मोडलेली हाडे आणि संक्रमीत झालेल्या जखमांमुळे मला हाय हाय! तेव्हा मी म्हणालो, “खचित हे माझे दु:ख आहे, आणि मला ते पूर्णपणे भोगलेच पाहिजे.”
¶ कारण परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, शत्रू गरुडाप्रमाणे उडत आहे. तो आपले पंख मवाबावर पसरील.
¶ पहिले सिंहासारखे असून त्यास गरुडाचे पंख होते. असा मी पाहत असता त्याचे पंख उपटून त्यास जमिनीवर मानवाप्रमाणे दोन पायावर उभे केले. त्यास मानवाचे हृदय देण्यात आले होते.
परमेश्वर रागवण्यास मंद आणि महापराक्रमी आहे; त्याच्या शत्रूंना तो निरापराध ठरवणार नाही. परमेश्वर झंझावातातून आणि वादळातून त्याचे मार्ग काढतो आणि मेघ त्याच्या चरणाची धूळ आहेत.
त्यांचे घोडे चित्यांपेक्षा वेगवान आहेत आणि संध्याकाळच्या लांडग्यांपेक्षा जलद आहेत. त्यांचे घोडेस्वार दिमाखाने पुढे धावत जातात, आणि त्यांचे घोडेस्वार दूरून येतात, खाण्यासाठी घाई करणाऱ्या गरुडाप्रमाणे ते उडतात.
‹तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील.›