TSK

TSK · यिर्म 43:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

फारो राजाने योसेफाला “सापनाथ-पानेह” असे दुसरे नाव दिले. फारोने ओन शहराचा याजक पोटीफर याची मुलगी आसनथ ही योसेफाला पत्नी करून दिली. योसेफ सर्व मिसर देशावर अधिकारी झाला.

¶ त्या दिवशी मिसर देशामध्ये पाच नगरे कनानाची भाषा बोलतील आणि ती सेनाधीश परमेश्वरापुढे एकनिष्ठतेची शपथ वाहतील. त्यातील एका नगरास सूर्याचे नगर म्हणतील.

दुसऱ्या राष्ट्रांनाही तो प्यावा लागेल, मी मिसरच्या राजा फारो, त्याच्या अधिकाऱ्यांना, त्याच्या सेवकांना, आणि त्याच्या लोकांस,

प्रभू परमेश्वर असे म्हणतोः मी मूर्तींचा नाश करीन आणि मी नोफातून कवडीमोलाच्या मूर्त्त्यां नाहीशा करीन. ह्यापुढे मिसर देशामध्ये कोणीही अधिपती होणार नाही आणि मी मिसर देशावर दहशत ठेवीन.