TSK

TSK · यिर्म 51:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ नंतर मोशे व इस्राएल लोक यांनी परमेश्वरास हे गीत गाईले. ते म्हणाले, “मी परमेश्वरास गीत गाईन कारण तो विजयाने प्रतापी झाला आहे; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात उलथून टाकले आहे.

तो पृथ्वीच्या सीमेपर्यंत लढाया थांबवतो; तो धनुष्य तोडतो आणि भाल्याचे तुकडे-तुकडे करतो; तो रथ जाळून टाकतो.

त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल.

परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.

मी राज्यांचे सिंहासन उलथवून टाकीन आणि राष्ट्रांचे बळ नष्ट करीन! मी त्यांच्या रथांना व सारथ्यांना उलथून टाकीन. त्यांचे घोडे व सारथी खाली पडतील, कारण प्रत्येकजण आपल्या भावाच्या तलवारीने पडेल.

¶ “पण, त्या दिवसामध्ये, मी घोड्याला भीतीने बिथरवीन आणि त्यामुळे प्रत्येक घोडेस्वाराचा गोंधळ उडेल. मी माझी कृपामय दृष्टी यहूदाच्या घराण्याकडे लावीन आणि मी शत्रूच्या प्रत्येक घोड्यांला अंधळे करीन, असे परमेश्वर म्हणतो.