TSK

TSK · योए 2:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुम्हास मुबलक धान्य मिळेल व ते वर्षभर पुरुन उरेल. तुम्हास नवीन धान्य आल्यावर जुने बाहेर काढावे लागेल म्हणजे नवीन धान्य ठेवावयास जागा मिळेल.

“पण इस्राएलाच्या पर्वतांनो, तुम्हावरील झाडास फांद्या फुटून तुम्ही माझ्या इस्राएल लोकांसाठी फळे द्याल असे लवकरच घडून येईल.

त्यादिवशी, असे होईल की, पर्वतावरून गोड द्राक्षरस पाझरेल, टेकड्यांवरून दूध वाहील, यहूदाच्या सर्व कोरडे पडलेल्या ओढ्यामधून पाणी वाहील, आणि परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील.

¶ सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “माझ्या घरात अन्न असावे यासाठी तुम्ही संपूर्ण दशमांश कोठरांत आणा. आणि तुम्ही असे केले म्हणजे मी तुमच्यासाठी आकाशाच्या खिडक्या उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हावर ओतीन की नाही याविषयी माझी प्रचिती पाहा.