TSK

TSK · योए 3:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मग इफ्ताहाने अम्मोनी लोकांच्या राजाजवळ वकील पाठवून म्हटले, “माझ्यात आणि तुझ्यात काय भांडण आहे? तू माझ्याशी लढावयास सैन्य घेऊन माझ्या देशात आमचा देश घेण्यास येत आहेस?”

कारण अदोमी लोकांनी पुनः येऊन यहूदात मार देऊन काही लोक बंदी करून नेले होते.

कारण सूड घेण्याचा परमेश्वराचा दिवस आहे. आणि सियोनेवर अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे.

कारण सर्व पलिष्ट्यांच्या नाशाची वेळ आली आहे, सोर आणि सीदोन यांतून वाचलेला प्रत्येक जो कोणी त्यांचे सहाय्य करणारा त्याचा नाश होईल. कारण परमेश्वर पलिष्ट्यांचा म्हणजे कफतोराच्या द्विपातील वाचलेल्यांचाही नाश करणार आहे.

¶ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, अदोमाने यहूदाच्या घराण्याविरूद्ध सूड घेतला आहे आणि असे करून त्यांने अपराध केला आहे.

त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात.

म्हणून मी तेमानावर अग्नी पाठवीन, ती बस्राचे राजवाडे खाऊन टाकील.”

‹“हे खोराजिना नगरा, तुझा धिक्कार असो, हे बेथसैदा नगरा तुझा धिक्कार असो, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यांच्यामध्ये केली असती तर त्यांनी त्वरेने पूर्वीच गोणपाट नेसून व अंगाला राख फासून पश्चात्ताप केला असता.›

शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, ‹“शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?”›