दुष्टांचा जयजयकार फार कमी काळासाठी असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो.
TSK
TSK · योहा 16:20
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तू माझे शोक करणे, नाचण्यात पालटवला आहे. तू माझे गोणताट काढून मला हर्षाचे वस्र नेसवले आहेत.
नितीमानासाठी प्रकाश आणि जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरला आहे.
¶ त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
सियोनेच्या शोक करणाऱ्यांस राखेच्या ऐवजी शोभा, शोकाच्या ठिकाणी आनंदाचे तेल, खिन्न आत्म्याच्या ठिकाणी प्रशंसेचे वस्र नेमून द्यायला त्याने मला पाठवले आहे. आणि त्याचा महिमा व्हावा म्हणून त्यांना न्यायीपणाची वृक्षे, परमेश्वराने लावलेले असे म्हणतील.
ते रडत येतील. ते विनंती करत असता मी त्यास नेईन, मी त्यांना सरळ मार्गाने पाण्याच्या प्रवाहाजवळ नेईन. ते त्यावर अडखळणार नाहीत. कारण मी इस्राएलाचा पिता आहे, आणि एफ्राईम माझा प्रथम जन्मलेला आहे.
‹‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, › ‹कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’›
जे जवळून जात होते ते आपली डोकी हलवून त्याची निंदा करून
आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला, ‹“दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील,”› असे येशू म्हणाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व मोठ्याने रडला.
ती गेली आणि रडून शोक करणाऱ्या त्याच्या अनुयायांना तिने हे वृत्त सांगितले.
आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पाहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले.
लोकांचा व स्त्रियांचा मोठा समुदाय त्याच्यामागे चालला, त्या स्त्रिया त्याच्यासाठी ऊर बडवून शोक करीत होत्या.
येशू त्यांना म्हणाला, ‹“चालत असताना तुम्ही एकमेकांबरोबर बोलत आहात त्या गोष्टी कोणत्या आहेत?”› चालता चालता ते थांबले. ते अतिशय दुःखी दिसले.
‹पण मी या गोष्टी तुमच्याशी बोलल्यामुळे तुमचे अंतःकरण दुःखाने भरले आहे.›
¶ पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या.
ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
¶ माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.
¶ आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांस अतोनात पीडले होते.