TSK

TSK · योहा 17:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्यांना जवळ आणा आणि पुरावा आणा, मला घोषणा करा! त्यांना एकत्र येऊन मसलत करू द्या. पूर्वीपासून तुम्हास हे कोणी दाखवले आहे? ते कोणी जाहीर केले? मी, परमेश्वरानेच की नाही? तर जो मी न्यायी देव व तारणारा त्या माझ्यावाचून कोणी दुसरा देव नाही; माझ्यावाचून कोणी नाही.

शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”

देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.

¶ यावरुन येशूने त्यांना उत्तर दिले; ‹“मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून काहीही त्यास स्वतः होऊन करता येत नाही; कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो.›

‹मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”›

‹तरी तुम्ही त्यास ओळखले नाही, मी त्यास ओळखतो आणि मी त्यास ओळखत नाही असे जर मी म्हणेन, तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण, मी त्यास ओळखतो आणि त्याचे वचन पाळतो.›

‹पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत.›

‹कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.›

‹सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.›

‹आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे.›

‹की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये एक व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.›

कारण मी फिरता फिरता तुमच्या उपासनेच्या वस्तू पाहतांना, अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करता ते मी तुम्हास जाहीर करतो.

¶ आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.

त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे.

नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.

¶ तथापि पूर्वी तुम्ही देवाला ओळखीत नव्हता, तेव्हा, जे स्वभावतः देव नाहीत त्यांचे दास होता;

तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्टांपासून वरिष्टांपर्यंत सर्वजण मला ओळखतील.

आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग हे त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे.