परमेश्वराने मोशेला म्हटले, तू अहरोनाला सांग की, आपली काठी घेऊन मिसर देशामधील नद्यांवर, नाल्यावर, त्यांच्या तलावावर व त्यांच्या सर्व पाण्याच्या तळ्यावर आपला हात उगार म्हणजे त्या सर्वांचे रक्त होईल, घरातील लाकडांच्या व दगडांच्या भांड्यात रक्तच रक्त होईल.”
TSK
TSK · योहा 2:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
त्याचे गौरवशाली नाव सर्वकाळ धन्यवादित असो आणि सर्व पृथ्वी त्याच्या गौरवाने भरली जावो. आमेन आणि आमेन.
¶ तुझ्या मार्गाने जा, आनंदाने आपली भाकर खा आणि आनंदीत मनाने आपला द्राक्षरस पी, कारण देवाने तुझी चांगली कृत्ये साजरी करण्यास मान्यता दिली आहे.
सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही ऐकले नाही, आणि माझ्या नावाला महिमा देण्याचे तुम्ही आपल्या हृदयांत आणले नाही, तर मी तुम्हावर शाप पाठवीन आणि तुमच्या आशीर्वादांना शापीत करीन, खचित मी त्यास आधीच शाप दिला आहे. कारण तू माझ्या आज्ञा आपल्या हृदयात पाळत नाहीस.
कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.
¶ आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरूशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.
¶ नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षरस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता.
तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती.
येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ‹“मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता.›
‹आणि मी तिथे नव्हतो म्हणून तुमच्यासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ या.” ›
¶ यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला.
‹पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.›
पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.
कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
¶ जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.