याजकाने त्यास तपासावे आणि जर ती जागा कातडीपेक्षा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झाले असले तर त्याने त्यास अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा आहे.
TSK
TSK · योहा 5:14
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,
¶ आमच्या वाईट कृत्यामुळे आणि महान दोषामुळे हे सर्व आम्हावर आल्यानंतर, हे आमच्या देवा आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हास केलेले शासन कमीच आहे आणि तू आम्हास वाचवून अवशेष ठेवले.
परमेश्वरा माझ्यावर दया कर, जो तू मला मरणाच्या दारातून उचलतोस तो तू, जे माझा द्वेष करतात त्यांच्यामुळे मी कसा पीडिला जात आहे ते पाहा.
तेव्हा माझ्या सभोवती असणाऱ्या शत्रू समोर माझे मस्तक उंचावले जाईल, आणि त्याच्या मंडपात मी सदैव आनंदाचा यज्ञ अर्पण करणार, मी गाईन, होय! परमेश्वरास मी स्तुती गाईन.
त्याने आपले वचन पाठवून त्यांना बरे केले, आणि त्याने त्यांच्या नाशापासून त्यांना सोडवले.
परमेश्वराने मला जबर शिक्षा केली; परंतु त्याने मला मृत्यूच्या हाती दिले नाही.
हिज्कीया असेही म्हणाला, मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन याचे चिन्ह काय?
त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, ‹“मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”›
ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, ‹“मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”›
‹मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही.›