मी, परमेश्वराने, तुला न्यायानुसार बोलाविले आहे आणि तुझा हात धरीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुला लोकांसाठी करार व परराष्ट्रीयांसाठी प्रकाश देणारा असे करीन.
TSK
TSK · योहा 8:29
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पण मी म्हणालो मी निरर्थक मेहनत केली, मी माझी शक्ती व्यर्थ घालवली आहे. तथापि माझा न्याय परमेश्वराजवळ आणि माझे प्रतिफळ माझ्या देवाजवळ आहे.
आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”
येशू त्यांना म्हणाला, ‹“ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे.›
‹कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे.›
‹मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे, असा विश्वास तू धरीत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हास सांगतो, त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कामे करतो.›
‹जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल.›
‹जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.›
¶ प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
¶ म्हणून ख्रिस्त जेव्हा या जगात आला, तेव्हा तो देवाला म्हणाला, “तुला यज्ञ व अर्पणे याची इच्छा नव्हती, त्याऐवजी तू माझ्यासाठी शरीर तयार केले.