TSK

TSK · यहो 22:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले, “अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.

याकोबाने फारोला आशीर्वाद दिला व मग तो फारोपुढून निघून गेला.

तेव्हा यहोशवाने त्यास आशीर्वाद दिला; आणि यफुन्नेचा पुत्र कालेब याला हेब्रोनाचे वतन दिले

मग यहोशवाने लोकांस त्यांना त्यांच्या वतनाकडे रवाना केले.

तेव्हा शमुवेलाने राजाच्या कारभाराचे नियम आणि कायदे लोकांस सांगितले, आणि ते एका पुस्तकात लिहून परमेश्वराच्या समोर ठेवले. मग शमुवेलाने सर्व लोकांस आपापल्या घरी पाठवून दिले.

होमार्पणे व शांत्यर्पणे केल्यावर दावीदाने सर्वांना सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने आशीर्वाद दिले.

मग दावीद घरातील सर्वांना आशीर्वाद द्यायला घरात आला. तेव्हा शौलकन्या मीखल हिने त्यास गाठले आणि ती म्हणाली, “इस्राएलाच्या राजाने आज आपला सन्मान राखला नाही. नोकरा-चाकरांसमोर, दासीसमोर त्या मूर्खांपैकीच एक असल्याप्रमाणे तुम्ही आपले वस्त्र काढलेत!”

एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.

¶ नंतर तो त्यांना बाहेर दूरवर बेथानीपर्यंत घेऊन गेला आणि त्याने हात वर करून आशीर्वाद दिला.