TSK

TSK · विला 2:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, बैल व मेंढरे, गाढवे वगैरे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला.

¶ तेव्हा खास्दी राजाला देवाने यहूदा व यरूशलेमेवर स्वारी करायला लावले. त्याने मंदिरात असलेल्या तरुणांनाही ठार केले. यहूदा व यरूशलेममधील लोकांवर त्याने दयामाया दाखवली नाही. लोकांस जिवे मारताना तरुण, कुमारी, वृध्द स्त्री-पुरुष, यावर त्याने तलवार चालवावी. देवानेच नबुखद्नेस्सराला यहूदा व यरूशलेमेच्या लोकांस शासन करायची मुभा दिली होती.

त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला.

त्यामुळे मी दुःखाचा आवाज ऐकतो आहे, पहिल्या बाळंतपणाच्या वेळेला स्त्री ज्याप्रमाणे किंकाळी फोडते, तसाच सियोनकन्येचा आवाज मी ऐकला आहे. ती श्वासाकरता धडपडत आहे, ती आपले हात पसरत आहे, “मला हाय हाय! कारण माझ्या घातक्यांमुळे माझा जीव कंटाळला आहे!”

तर स्त्रियांनो, परमेश्वराचे वचन ऐका, त्याच्या मुखातील निघणाऱ्या संदेशाकडे चित्त लावा. नंतर तुमच्या मुलींना मोठ्याने विलाप करण्यास शिकव आणि शेजारील प्रत्येक स्त्रीला शोकगीत शिकवा.

यास्तव सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, पाहा! “त्यांना मी शिक्षा करीन. त्यांचे तरुण तलवारीने मरण पावतील. त्यांची मुले आणि त्यांच्या मुली दुष्काळाने मरतील.

यास्तव त्यांच्या मुलांना दुष्काळात सोड, आणि तलवार या कडे त्यांना सोपवून दे. त्यांच्या स्त्रिया वांझ आणि विधवा होवोत, आणि त्यांचे पुरुष मरणाने मारले जावोत, युद्धात तेथील तरुण मारले जावोत.

तुझ्याबरोबर मी प्रत्येक पुरुष आणि स्त्रिया यांचे तुकडे तुकडे करीन; तुझ्याबरोबर मी वृद्ध आणि तरुण यांचे तुकडे तुकडे करीन. तुझ्याबरोबर मी तरुण पुरुष आणि कुमारी मुलगी यांचे तुकडे तुकडे करीन.

“परमेश्वर न्यायीच आहे, कारण मी त्याच्या आज्ञेविरूद्ध बंड केले आहे. सर्व लोकांनो, ऐका! आणि माझे दु:ख पाहा! माझ्या कुमारी व माझे तरुण पाडावपणांत गेले आहेत.

परमेश्वराने सिद्ध केल्याप्रमाणे सर्व केले आहे. त्याने फार पूर्वी जाहीर केलेले आपले अभिवचन पूर्ण केले आहे. त्याने चिरडून टाकले आणि त्यांच्यावर त्याने दया दाखविली नाही. त्याने तुझ्या शत्रूंना प्रबळ केले आहे.

म्हणून जसा मी राहलो, परमेश्वर देव म्हणतो, निश्चितच तुम्ही किळस राग आणणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. म्हणून तुमची संख्या कमी करून तुमच्यावर दया करणार नाही.

मी तुम्हाकडे करुणेने बघणार नाही, आणि तुझी गय मी करणार नाही, तुझ्या कामाची परतफेड तुझ्यावर होईल. तुम्हामध्ये घृणा वास करेल मग तुम्हास समजेल मी परमेश्वर देव आहे. जो शिक्षा करणारा आहे.

ऐकायला जाईल अशा अंतरावर मग तो बोलला शहरात त्यानंतर प्रवेश कर, व मारुन टाक, कुणावरही दया करु नकोस.

इस्राएलाच्या घराण्याला सांग, परमेश्वर देव असे सांगत आहे पाहा! घमंड तुझी ताकत झाली आहे तुझ्या डोळ्यांना जे बरे वाटते ते तुझ्या जीवाच्या वासनेने माझे पवित्रस्थान विटाळले आहे! आणि जी तुझी मुले व ज्या तुझ्या मुली मागे उरलेल्या होत्या त्या तलवारीने खाली पडल्या आहेत.

मला या देशात राहणाऱ्या लोकांबद्दल यापुढे दु:ख होणार नाही.” परमेश्वर असे म्हणतो. “पाहा! मी त्यांना एकमेकांच्या व राजाचा तावडीत देईन; आणि याप्रकारे ते देशाचा नाश करतील व मी त्यांना त्यांच्या हातातून सोडविणार नाही.”