ईयो 11:13
TSK
परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.
TSK
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परंतु तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी देवाच्या दिशेने उचलले पाहिजेस.
जेव्हा मी तुला मदतीसाठी हाक मारतो, जेव्हा मी आपले हात तुझ्या पवित्र ठिकाणाकडे उंचावतो, तेव्हा माझी विनवणी ऐक.
हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर, कारण मी आपला जीव वर तुझ्याकडे लावतो.
माझी प्रार्थना तुझ्यासमोर धुपाप्रमाणे, ती माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.