TSK

TSK · लेवी 16:28

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल;

कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे.

ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो.

¶ याजकाने स्वत:ला आणि त्याच्या कपड्यांना स्वच्छ पाण्याने धुवावे. आणि मगच छावणीत परत यावे. याजक संध्याकाळपर्यंत अशुद्ध असेल.

ज्या मनुष्याने कालवडीची राख गोळा केली असेल त्याने त्याचे कपडे धुवावे. तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. हे नियम नेहमी अस्तित्वात असतील. हा नियम इस्राएलच्या सर्व नागरिकांसाठी आहे आणि तुमच्याबरोबर जे परदेशी लोक राहत आहेत त्यांच्यासाठीही हा नियम आहे.