TSK

TSK · लेवी 23:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.

¶ जर परमेश्वराकरीता तुला अन्नार्पण म्हणून पहिल्या हंगामाचा उपज अर्पावयाचा असेल तर विस्तवावर भाजलेल्या हिरव्या कणसातले चोळून काढलेले ताजे दाणे आण; हे हंगामातील तुझ्या प्रथम पिकाचे अन्नार्पण होय.

¶ आठव्या दिवशी त्या मनुष्याने दोन निर्दोष कोकरे, एक वर्षाची निर्दोष मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेला तीन दशांश एफा मैदा, व एक लोगभर तेल ही सामग्री याजकाकडे आणावी;

प्रत्येक कोकऱ्याच्या होमार्पणाकरता किंवा यज्ञाकरता पेयार्पणासाठी एका हीनाचा एक चतुर्थाश द्राक्षरस तयार कर.

पाणी साठ हिन मोजून वेळो वेळी तुझ्या पीण्यासाठी असेल.

आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.

याजकांनो, गोणताट घाला आणि शोक करा! वेदीची सेवा करणाऱ्यांनो, आक्रोश करा. माझ्या परमेश्वराच्या सेवकांनो, या, तुम्ही पूर्ण रात्र गोणताट घालून राहा. कारण तुमच्या देवाच्या मंदिरात यापुढे अन्नार्पणे व पेयार्पणे अडकवून ठेवलेली आहेत.