TSK

TSK · लेवी 24:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल;

“अहरोनाशी बोल. त्यास सांग, जेव्हा तू दिवे लावतोस तेव्हा त्या सात दिव्यांचा प्रकाश दीपस्तंभाच्यासमोर पडावा.”

परमेश्वरास ते होमार्पणे करतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वरास सोडले आहे.

तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने अशिक्षितास ज्ञान प्राप्त होते.

म्हणून तुम्ही नियमशास्त्र व विधी याकडे लक्ष दिले पाहीजे! ते अशा गोष्टी बोलत नाहीत कारण त्यांना प्रभात प्रकाश नाही.

जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.”

¶ ‹तेव्हा त्या दिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.›

¶ ‹तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.›

¶ जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता.

¶ पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, ‹“मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”›

कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.

कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा.