¶ तुझा एखादा परदेशीय किंवा उपरी शेजारी धनवान झाला व त्याच्यापाशी असलेला तुझा एखादा बंधू कंगाल होऊन त्याने स्वत:स तुम्हामध्ये राहत असणाऱ्या त्या परदेशीयाला किंवा परदेशीयाच्या कुटुंबातील एखाद्याला गुलाम म्हणून विकले असेल;
TSK
TSK · लेवी 25:25
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करण्याचे सोडले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा मनुष्य आपल्या नातलगांपैकी आहे, एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास अधिकार आहे.”
तेव्हा तो तिला म्हणाला, “तू कोण आहेस?” ती म्हणाली, “मी आपली दासी रूथ आहे, या आपल्या दासीला आपल्या पांघरूणाखाली घ्या. कारण आमचे वतन सोडविण्याचा अधिकार आपल्याला आहे.”
आणि तुला हे कळवावे व येथे या बसलेल्यांसमोर आणि माझ्या वडीलजनांसमोर तू तो विकत घ्यावा. तो जर खंडणी भरून सोडवशील तर मला सांग, म्हणजे मला कळेल, कारण खंडून घेण्यास तुझ्याशिवाय कोणी नाही, तुझ्यानंतर मी आहे.” तो म्हणाला, “मी खंडून घेईन.”
पाहा, तुझा काका शल्लूम यांचा मुलगा हानामेल तुझ्याकडे येईल आणि म्हणेल जे माझे शेत अनाथोथात आहे ते तू आपल्यासाठी विकत घे, कारण ते खरेदी करण्याचा अधिकार तुझा आहे.
तो आणखी म्हणतो, “मी माझा विश्वास त्याच्यावर ठेवीन.” आणि तो पुन्हा म्हणतो, येथे मी आहे आणि माझ्याबरोबर देवाने दिलेली मुले आहेत.