व माझा राग तुम्हावर भडकेल व मी तुम्हास तलवारीने मारून टाकीन म्हणजे तुमच्या स्रिया विधवा व तुमची मुले पोरकी होतील.
TSK
TSK · लेवी 25:36
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तुम्ही एकमेकांवर अन्याय करु नये; तुम्ही परमेश्वराचे भय धरावे मी परमेश्वर तुमचा देव आहे!
काहीजण म्हणत होते “दुष्काळ असताना धान्यासाठी आम्हास आमची शेते, द्राक्षमळे आणि घरे गहाण टाकावी लागत आहेत.”
पण माझ्या आधी सतेवर असलेले राज्यपाल लोकांवर भारी बोजा लादित व त्यांच्यापासून भाकरी, द्राक्षरस घेऊन आणखी प्रत्येकी चाळीस शेकेल रुपे घेत असत. त्यांचे सेवक देखील लोकांवर जुलूम करीत असत. पण मी तसे केले नाही कारण मला देवाचे भय होते.
जो कोणी आपले धन खूप जास्त व्याज लावून वाढवतो त्याची संपत्ती जो कोणी गरिबांवर दया करतो त्या दुसऱ्यासाठी साठवतो.
जर त्याने व्याजाने उसने घेतले किंवा अन्यायाने नफा मिळवला, तो जगेल का? तो जगणार नाही त्याने किळस वाणे हे सर्व काम केले तो खात्रीने मरेल त्याच्या रक्ताचा झडा त्याच्याच माथी येईल.
असा पुरुष रक्तपात करण्यासाठी लाच घेतो, तू अति प्रमाणात व्याज घेतो, तू तुझ्या कामाने शेजाऱ्याचे नुकसान केले आहेस, आणि तू मला विसरला आहेस. असे परमेश्वर देव जाहीर करतो.