TSK

TSK · लेवी 5:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

त्याचे पाय व आतडी ही पाण्याने धुवावी, मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करून तो अर्पावा, हे होमार्पण आहे; हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले अर्पण होय.

त्याने तो पक्षी पंखाच्या मधोमध फाडावा, परंतू त्याचे दोन वेगळे भाग करू नयेत; मग याजकाने त्या पक्षाचा वेदीवरील जळत्या लाकडावर होम करावा; हे पण होमार्पण आहे. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय.

मग याजकाने अन्नार्पणातून काही भाग घेऊन परमेश्वराच्या महान चांगुलपणाबद्दल वेदीवर त्याचा होम करावा. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय आणि ते परमेश्वरासाठी सुवासीक हव्य होय.

दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कमरेजवळची चरबी, आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे

त्याने शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीप्रमाणे त्याची सर्व चरबी काढून घ्यावी आणि होमवेदीवर तिचा परमेश्वरासाठी होम करावा. ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापांबद्दल याजकाने प्रायश्चित करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.

मग त्यातील मूठभर अन्नार्पण घेऊन त्याचे स्मारक म्हणून ते वेदीवर जाळावे. त्यानंतर याजकाने त्या स्त्रीला हे पाणी पिण्यास सांगावे.

आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.