TSK

TSK · लेवी 7:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगळून मोडावी परंतु ते वेगळे करु नये

¶ नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला,

अहरोन व त्याचे पुत्र ह्याना सांग की पापार्पणाचा विधी असा. ज्याठिकाणी होमबलीचा वध करतात त्याच ठिकाणी परमेश्वरासमोर पापबलीचाही वध करावा; तो परमपवित्र आहे.

हे पाप केलेल्या मनुष्याने आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा दोषार्पणासाठी, दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर आणावा;

¶ त्याने परमेश्वरासाठी वेगळे होण्यासाठी स्वत:ला पुन्हा समर्पित करावे. त्याने एक वर्षाचा मेंढा दोषार्पणासाठी आणावा. त्याने आपल्याला अशुद्ध करून घेण्याच्या पूर्वीचे दिवस मोजू नयेत. कारण तो देवासाठी वेगळा झाला तेव्हा तो अशुद्ध झाला होता.

द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन मेजे होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यासाठी आणलेले पशू कापीत असत.

तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”