TSK

TSK · लेवी 7:32

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी परमेश्वर इस्राएल लोकांच्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीतून ओवाळणीचा ऊर व उजवी मांडी काढून घेऊन अहरोन याजक व त्याचे पुत्र ह्याना दिली आहे; हा इस्राएल लोकांकडून त्यांना मिळणारा नेहमीचा हिस्सा आहे. इस्राएल लोकांनी हा निरंतरचा विधी म्हणून पिढ्यानपिढया पाळावा.”

अहरोनाने बलींचे ऊर व उजवी मांडी ही मोशेच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळली.

मग याजकाने ते अर्पणाप्रमाणे परमेश्वरासमोर उंच करून त्यास सादर करावे. जे मेंढ्याचे ऊर व मांडीसह एकत्रित परमेश्वरापुढे उंच केलेले हे याजकासाठी राखून ठेवलेले पवित्र अन्न आहे. त्यानंतर नाजीर मद्य पिऊ शकतो.

यज्ञासाठी गोऱ्हा किंवा मेंढरू मारताना त्या जनावराचा खांद्याचा भाग, गालफडे व कोथळा याजकाला द्यावा.

जे निवास्थानाचा भवनातील पवित्र वस्तूंची सेवा करतात ते भवनातील अन्न खातात आणि जे वेदीपुढे उभे राहतात ते वेदीचे भागीदार होतात, हे तुम्ही जाणत नाही काय?