मग तो मेंढा वधावा व त्याच्या रक्तातून थोडे रक्त घेऊन ते अहरोनाच्या व त्याच्या मुलांच्या उजव्या कानांच्या पाळ्यांना व त्यांच्या उजव्या हातांच्या व उजव्या पायांच्या अंगठ्यांना लावावे आणि बाकीचे रक्त वेदीवर चार बाजूंना शिंपडावे.
TSK
TSK · लेवी 8:23
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील, उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषार्पणाच्या रक्तावर लवावे.
¶ मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर, उजव्या हाताच्या व उजव्या पायाच्या अंगठ्यांवर, दोषार्पणाचे रक्त लावलेल्या जागेवर लावावे.
मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
करिंथ शहरात असलेल्या देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेले आणि पवित्रजन होण्यास बोलावलेले आहेत त्यांना व आपला प्रभू येशू ख्रिस्त, म्हणजे त्यांचा व आमचाही प्रभू, याचे नाव सर्व ठिकाणी घेणाऱ्या सर्व लोकांस,
कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
¶ तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.