TSK

TSK · लूक 20:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यासाठी परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “पाहा, मी सियोनेत आधारशिला, पारखलेला धोंडा, कोपऱ्याचा मोलवान धोंडा, स्थीर पाया म्हणून घालतो. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल, तो लाजवला जाणार नाही.

¶ येशू त्यांना म्हणाला, ‹“तुम्ही शास्त्रलेखात कधी वाचले नाही काय?› ‹‘बांधणाऱ्यांनी नाकारलेला› ‹दगड कोनशिला झाला आहे.› ‹हे प्रभूने केले आणि› ‹आमच्या दृष्टीने हे अद्भूत आहे.’›

¶ येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ‹“देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.”›

¶ तो जेव्हा जवळ आला व त्याने शहर पाहिले, तेव्हा तो त्यासाठी रडला आणि म्हणाला,

आणि प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले तेव्हा पेत्राला प्रभूने उच्चारिलेले वाक्य आठवले, ‹“आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील,”› असे सांगितलेले त्यास आठवले.

‹तथापि ‘त्यांनी विनाकारण माझा द्वेष केला’ हे जे वचन त्यांच्या शास्त्रात लिहिले आहे ते पूर्ण व्हावे म्हणून हे असे होते.›

¶ म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’