TSK

TSK · लूक 21:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची सर्व पात्रे परमेश्वराकरता पवित्र आहेत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत.”

त्याने परमेश्वराच्या मंदिरातील आणि महालातील खजिना लुटला. अरामाचा राजा हददेजर याच्या सैनिकांकडून ज्या शलमोनाने सोन्याच्या ढाली आणल्या होत्या, त्याही त्याने पळवल्या. दाविदाने त्या यरूशलेमेमध्ये ठेवल्या होत्या. सोन्याच्या सगळ्या ढाली त्याने नेल्या.

देवाच्या मंदिरातील लहानमोठी सर्व पात्रे व निधी, आणि राजा व त्याचे सरदार ह्यांचे निधी ही सर्व तो बाबेलास घेऊन गेला.

मुख्य याजकांनी चांदीची ती तीस नाणी घेतली आणि ते म्हणाले, “हे पैसे परमेश्वराच्या भवनाच्या खजिन्यात ठेवता येणार नाहीत. हे आमच्या नियमांविरूद्ध आहे, कारण ते पैसे कोणाला तरी जिवे मारण्यासाठी दिले होते.”

¶ येशू दानपेटीच्या समोर बसून लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते.