आपल्या ऐश्वर्याची बढाई मारायला हामानाने सुरुवात केली आणि आपली पुत्रसंतती, राजाने केलेले आपले अनेक प्रकारचे सन्मान, राजाने आपल्याला दिलेले सर्वोच्च अधिकाराचे स्थान या सगळ्यांची तो बढाई मारु लागला.
TSK
TSK · लूक 4:6
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
सर्व शोभेच्या वैभवाला डाग लावण्यासाठी व पृथ्वीतल्या सर्व प्रतिष्ठांना अप्रतिष्ठीत करण्यासाठी सेनाधीश परमेश्वराने हे योजिले आहे.
‹आता या जगाचा न्याय होतो, आता या जगाचा शासक बाहेर टाकला जाईल.›
आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.
¶ कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते.
तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणाऱ्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.