TSK

TSK · मला 2:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ काही काळानंतर काइनाने परमेश्वरास शेतामधील फळांतले काही अर्पण आणले.

¶ मीही त्या मनुष्याच्या विरूद्ध होईन! आणि त्यास आपल्या लोकांतून बाहेर टाकीन! कारण त्याने आपले मूल मोलख दैवतास अर्पून माझे पवित्रस्थान भ्रष्ट केले व माझ्या पवित्र नावाला कलंक लावला!

हे याकोबा तुझे तंबू, हे इस्राएला, जिथे तू राहतो ते किती सुंदर आहे!

पाहा असे दिवस येत आहे की, ज्यात मी तुझे सामर्थ्य व तुझ्या वडिलाच्या घराण्याचे सामर्थ्य कापून टाकीन आणि तुझ्या घराण्यात कोणी म्हातारा होणार नाही.

शमुवेल म्हणाला, “परमेश्वरास आपले वचन पाळण्याने जितका आनंद होतो तितका आनंद होमार्पणांनी व यज्ञांनी होतो काय? पाहा यज्ञापेक्षा आज्ञा पालन करणे आणि मेंढरांच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे अधिक चांगले आहे.

¶ याजकांच्या ज्या वंशजांनी परकीय स्त्रियांशी विवाह केले त्यांची नावे पुढीलप्रमाणे, योसादाकाचा मुलगा येशूवा याच्या वंशातील आणि त्याच्या भाऊबंदांच्या वंशातील मासेया, अलियेजर, यारीब, गदल्या.

म्हणून परमेश्वर इस्राएलाचे शीर व शेपूट, तालवृक्षाची फांदी व लव्हाळा एका दिवसात छाटून टाकील.

कारण मी परमेश्वर न्यायावर प्रीती करतो, आणि मी दरोडेखोर आणि हिंसक अन्यायाचा तिरस्कार वाटतो. मी विश्वासाने त्यांचे प्रतिफळ त्यांना देईन, आणि मी माझ्या लोकांबरोबर सर्वकाळचा करार करीन.

ते त्यांच्या घोर अन्यायाचे फळ भोगतील संदेष्ट्यांचा घोर अन्याय आणि ज्यांनी प्रश्न विचारला ते दोघेही घोर अन्यायाचे फळ भोगतील.

पण कुणालाही वाद घालू देऊ नका, कोणीही कोणावर आरोप न लावो, कारण याजकांनो हे तुम्ही आहात ज्यांस मी दोष लावत आहे.

¶ परमेश्वर, प्रथम, यहूदाच्या तंबूंना वाचवील म्हणजे यरूशलेमेमधील राहणाऱ्यांचे आणि दावीदाच्या घराण्यातील लोकांचे गौरव यहूदापेक्षा मोठे होणार नाही.

¶ आम्हास एकच पिता नाही काय? एकाच देवाने आपल्याला निर्माण केले नाही काय? मग आम्ही आपापल्या भावाविरुद्ध विश्वासघात करून आपल्याच पूर्वजांचा करार का मोडतो?

पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.