परमेश्वराचा करार कोश उचलून आणणाऱ्या लेव्यांना देवाने साहाय्य केले. त्यांनी सात बैल आणि सात मेंढे यांचे यज्ञार्पण केले.
TSK
TSK · मला 3:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
दावीदाने तेथे परमेश्वराकरता वेदी बांधली आणि त्यावर त्याने होमार्पणे आणि शांत्यर्पणे अर्पण केली. त्याने परमेश्वरास हाक मारली व त्याने स्वर्गातून होमार्पणाच्या वेदीवर अग्नी पाठवून उत्तर दिले.
दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर पितळी वेदी होती तेथे शलमोनाने एक हजार होमार्पणे केली.
सातव्या महिन्याच्या तेविसाव्या दिवशी शलमोनाने लोकांस घरोघरी परतायला सांगितले. दावीद, शलमोन आणि इस्राएल लोक यांच्यावर परमेश्वराने कृपा केल्यामुळे लोक आनंदी झाले होते. त्यांची अंत:करणे आनंदाने भरुन गेली होती.
हिज्कीया म्हणाला, “यहूदातील लोकहो, तुम्ही आता स्वत:ला परमेश्वराच्या हवाली केले आहे. तेव्हा जवळ येऊन यज्ञाची आणि उपकारस्मरणाची अर्पणे आणा.” तेव्हा लोकांनी ती अर्पणे आणली. ज्यांना हवी होती त्यांनी मनोभावे होमार्पणेही आणली.
राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.
मी तुझे सर्व न्यायधीश पूर्वी जसे होते तसे करीन, तुझे सर्व सल्लागार सुरवातीस जसे होते तसे करीन, त्यानंतर तुला नीतिमानांची विश्वासू नगरी म्हणतील.”
“जा आणि यरूशलेमेच्या कानामध्ये अशी घोषणा कर, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्याविषयी तुझ्या तरूणपणाची निष्ठा, तुझ्या वाडनिश्चयाची प्रिती, जेव्हा तुम्ही वाळवंटातून आणि पडीत जमिनीतून माझ्यामागे आलात, हे माझ्या ध्यानात आहे.
¶ सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, असे म्हणतो, “जेव्हा मी लोकांस परत त्यांच्या देशात आणीन, यहूदाच्या नगरांत व देशात राहणारे ते हे म्हणतील, ‘तुझी धार्मिकतेची जागा जेथे तो राहतो, तू पवित्र पर्वता, परमेश्वर तुझे कल्याण करो!
सात दिवस ते वेदीचे प्रायश्चित करतील व तिला शुद्ध करतील. अशा रीतीने त्यांनी ते पवित्रीकरण विधी करावे.
¶ त्यावेळी, घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा “परमेश्वरासाठी पवित्र” अशी अक्षरे कोरलेली असतील आणि परमेश्वराच्या मंदिरातीली भांडी, वेदींपुढील कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.