TSK

TSK · मला 4:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

ते त्या राजांना यहोशवाकडे घेऊन आले तेव्हा त्याने सर्व इस्राएल लोकांस बोलावून आणले. मग तो आपल्याबरोबर लढाईवर गेलेल्या योद्ध्यांच्या सेनानायकांना म्हणाला, “पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय द्या.” तेव्हा त्यांनी पुढे येऊन त्यांच्या मानेवर पाय दिले.

होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.

परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.

दीनदुबळ्यांचे पाय व दरिद्र्यांचे पाय त्यांना तुडवतील.

तुझ्या खूप पापांमुळे आणि व्यापारातील अप्रामाणिकपणामुळे, तू आपले पवित्र स्थान अपवित्र केलेस. म्हणून मी तुझ्यामधून अग्नी काढला आहे, त्याने तुला खाऊन टाकले आहे. जे कोणी पाहतात त्या सर्वांच्यादेखत मी पृथ्वीवर तुझी राख केली आहे.

¶ राज्य, प्रभूत्व आणि अखिल पृथ्वीवरचे वैभव सर्वोच्च देवाच्या पवित्र जनांना देण्यात येईल. त्याचे राज्य अनंतकालचे आहे; आणि इतर त्याची सेवा करून त्याचे आज्ञापालन करतील.”

मग माझा शत्रू हे पाहिल; “तुझा देव परमेश्वर कोठे आहे?” असे ज्याने मला म्हटले त्यास लाज झाकून टाकेल. माझे डोळे तिच्याकडे पाहतील, रस्त्यावरील चिखलाप्रमाने ती तुडवली जाईल.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “मी हे करीन त्या दिवशी ते माझे, म्हणजे माझे खासगीचे धन होतील, आणि जसा कोणी आपली सेवा करणारा आपला मुलगा याच्यावर दया करीत असतो तसा मी त्यांच्यावर दया करीन.

¶ मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.