त्याने त्यास उत्तर दिले, ‹“स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.›
TSK
TSK · मार्क 4:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
येशू म्हणाला, ‹“शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.›
¶ त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, ‹“हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बालकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.›
कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध? त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?
देवाने गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे जी त्याने ख्रिस्ताच्याद्वारे आपल्या इच्छेप्रमाणे प्रदर्शित केली.
¶ बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.
त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.
¶ माझ्या प्रिय बंधूंनो, स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका.