TSK

TSK · मार्क 4:35

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ मग येशूने आपल्या सभोवती लोकसमुदाय आहे असे पाहून त्यांना गालीलच्या सरोवरापलीकडे जाण्याची आज्ञा केली.

¶ मी लोकसमुदायास निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा असे म्हणून त्याने लगेच शिष्यांना पाठवून दिले.

¶ नंतर मी लोकसमुदायाला निरोप देतो आणि तुम्ही तारवात बसून पलीकडे बेथसैदा येथे जा, असे सांगून येशूने लगेचच शिष्यांना त्याच्यापुढे जाण्यास सांगितले.

¶ आणि त्या दिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि ‹“आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ”› असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली.

¶ या गोष्टी झाल्यानंतर येशू गालीलच्या सरोवराच्या दुसर्‍या बाजूस गेला ज्याला तिबिर्य सरोवरसुद्धा म्हणतात.

¶ आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?”