TSK

TSK · मार्क 4:38

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ दुपारी एलीया त्यांची थट्टा करायला लागला. तो त्यांना म्हणाला, “बाल खरच देव असेल तर तुम्ही आणखी मोठ्याने प्रार्थना करा. कदाचित् तो अजून विचारात असेल. किंवा कदाचित् कामात गुंतलेला असेल. एखादयावेळी प्रवासात किंवा झोपेत असले. तेव्हा आणखी मोठ्याने प्रार्थना करून त्यास उठवा.”

हे परमेश्वरा, तू दूर का उभा आहेस? संकटकाळी तू स्वत:ला का लपवतोस?

प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.

हे याकोबा, तू असे का म्हणतोस, आणि इस्राएलास जाहीर करतोस, माझे मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहेत आणि माझा देव माझ्या समर्थनाविषयी लक्ष देत नाही?

परमेश्वराच्या बाहू जागा हो, जागा हो, आणि सामर्थ्य धारण कर, जसा प्राचीन दिवसात, पुरातन काळात तसा जागा हो. ज्याने समुद्रातील राक्षसास आणि मगराला भोसकले तो तूच नाही काय?

स्वर्गातून खाली पाहा आणि तुझ्या पवित्र व तेजोमय वस्तीतून नोंद घे. तुझा आवेश आणि तुझी महतकृत्ये कोठे आहेत? तुझी करुणा आणि दयाळू कृती आमच्याकडून ठेवल्या आहेत

मी मदतीसाठी आक्रोशाने धावा केला तेव्हाही तो माझ्या प्रार्थनांचा धिक्कार करतो.

तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले.

या कारणासाठी देवाच्या सेवेतील दयाळू व विश्वासू असा महायाजक होण्यासाठी आणि लोकांच्या पापांसाठी प्रायश्चित करण्यासाठी येशूला सर्व गोष्टींमध्ये आपल्या बांधवांसारखे होणे अत्यंत आवश्यक होते.

तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.