तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.
TSK
TSK · मार्क 7:22
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
तेव्हा शौलला फार राग आला, आणि त्या गाण्याने त्यास वाईट वाटून त्याने म्हटले, “त्यांनी दावीदाला दहा हजारचे यश दिले आणि मला मात्र हजाराचे यश दिले. राज्याशिवाय त्यास आणखी काय अधिक मिळवायचे राहिले?”
एकदा देशात घडलेल्या चमत्कारांविषयी चौकशी करायला बाबेलच्या अधिपतींनी त्याच्याकडे राजदूत पाठवले. तेव्हा हिज्कीयाची पारख करावी आणि त्याचे मन जाणून घ्यावे म्हणून देवाने त्यास एकटे सोडले.
शहाणा मनुष्य आपले ज्ञान गुप्त ठेवतो, पण मूर्खाचे हृदय मूर्खपणा ओरडून सांगते.
जो कोणी तुझ्या अन्नाकडे खूप वेळ पाहतो त्या दुष्ट मनुष्याचे अन्न खाऊ नको, आणि त्याच्या मिष्टान्नाची इच्छा धरू नको,
जरी तू मूर्खाला कुटलेल्या धान्याबरोबर उखळात घालून मुसळाने कुटले, तरी त्याची मूर्खता त्याच्यापासून जाणार नाही.
मी माझे मन अभ्यास आणि निरीक्षण याकडे वळवले. आणि ज्ञान आणि वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण शोधले, आणि मला हे कळाले की, दुष्ट असणे हा मूर्खपणा आहे. आणि मूर्खासारखे वागणे हा शुद्ध वेडेपणा आहे.
‹पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार!›
तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.