TSK

TSK · मत्त. 19:5

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

याकोबाची मुलगी दीना हिच्याकडे तो आकर्षित झाला. त्या मुलीवर त्याचे प्रेम जडले आणि तो प्रेमळपणे तिच्याशी बोलला.

तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचेच भय धरा व त्याचीच सेवा करा, त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्यास धरुन राहा, शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या.

¶ तेव्हा असे झाले की, दावीदाने शौलाशी बोलणे समाप्त केले असता, योनाथानाचा जीव दावीदाच्या जिवाशी जडला होता आणि योनाथान आपल्या जिवा सारखी त्याच्यावर प्रीती करू लागला होता.

बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.

मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.

येशू म्हणाला, ‹“केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली.›

तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील.

पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो.