¶ परंतु जर तुम्ही माझे ऐकले नाही व या सर्व आज्ञा पाळल्या नाहीत;
TSK
TSK · मत्त. 21:41
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परंतु तो जो आकाशांत बसलेला आहे तो हसेल, प्रभू त्यांचा उपहास करेल.
आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे ते तुम्हास सांगतो. मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढीन. मी त्यास कुरण असे करीन, त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून टाकील आणि ती पायाने तुडवीली जाईल.
तुम्ही तुमची नावे माझ्या निवडलेल्यांसाठी बोलावे म्हणून शाप अशी ठेवून जाणार. मी, प्रभू परमेश्वर, तुम्हास ठार मारील. मी माझ्या सेवकांना नव्या नावाने बोलावील.
¶ बासष्ट आठवड्यानंतर अभिषिक्ताचा वध करण्यात येईल व त्याकडे काही उरणार नाही जो येणारा अधिपती त्याचे सैन्य शहर आणि वेदी यांचा नाश करतील, त्याचा नाश पुराने होईल युध्द शेवटपर्यंत होईल सर्व काही उजाड होण्याची घोषणा झाली आहे.
¶ देश विलाप करील, प्रत्येक कुटुंब वेगवेगळे होतील, आक्रोश करतील. दावीदाच्या कुळातील पुरुष एकीकडे, तर त्यांच्या स्त्रिया दुसरीकडे आक्रंदन करतील. नाथानाचे घराणे व त्यांच्या बायकादेखील वेगवेगळा विलाप करतील.
यरूशलेमेशी लढावयास मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांना लुटतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे-अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांस नगरीतून नेले जाणार नाही.
त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”
‹म्हणून मी तुम्हास सांगतो की, देवाचे राज्य तुमच्याकडून काढून घेण्यात येईल आणि जे राष्ट्र त्यातली फळे देईल त्यास ते दिले जाईल.›
‹म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.›
‹तेथे रडणे व दात खाणे चालेल, तेव्हा तुम्ही अब्राहामाला आणि इसहाकाला आणि याकोबाला आणि सर्व संदेष्ट्यांना देवाच्या राज्यामध्ये पाहाल, पण तुम्ही स्वतः मात्र बाहेर टाकलेले असाल.›
‹लोटाच्या पत्नीची आठवण करा.›
‹ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत.›
तेव्हा पुष्कळ वादविवाद झाल्यावर पेत्र उभा राहून त्यांना म्हणाला बंधुजनहो, तुम्हास ठाऊक आहे की, माझ्या तोडून सुवार्ता ऐकून परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवावा म्हणून आरंभीचा दिवसांपासून तुम्हामध्ये देवाने माझी निवड केली.
पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्यक्तीला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले.
¶ मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
परराष्ट्रीयांचे तारण व्हावे म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर बोलावे याची ते मनाई करतात; हे ह्यासाठी की, त्यांनी आपल्या पापांचे माप सर्वदा भरीत रहावे; त्यांच्यावरील देवाच्या क्रोधाची परिसीमा झाली आहे.
¶ मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.