सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे.
TSK
TSK · मत्त. 24:39
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जर तू म्हणशील, “तेथे! आम्हांस ह्याबद्दल काहीच माहित नव्हते.” तर तू काय म्हणतो हे जो कोणी हृदये तोलून पाहतो त्यास हे समजणार नाही का? आणि जो कोणी तुझ्या जिवाचे रक्षण करतो त्यास माहित नाही का? आणि देव प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही कां?
म्हणून त्याने आपला भडकलेला कोप त्यांच्याविरुद्ध नासधूसीच्या युद्धासह ओतला. त्याने त्यांच्या सभोवती आग लावली तरी त्यांना कळले नाही; त्यास जाळले. पण तरी तो मनावर घेईना.
‹यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही.›
‹ते तुला, तुझ्या मुलांना तुझ्या भिंतीच्या आत धुळीस मिळवतील व दगडावर दगड राहू देणार नाही कारण तू देवाचा तुझ्याकडे येण्याचा समय तू ओळखला नाही.”›
अहो धिक्कार करणाऱ्यांनो, पाहा, आश्चर्य करा व नाहीसे व्हा, कारण तुमच्या काळामध्ये मी एक कार्य करतो, ज्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही कोणी ते स्पष्ट करून सांगितले तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही.”
कारण ते हे जाणूनबुजून विसरतात की, देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली.