¶ या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
TSK
TSK · मत्त. 5:12
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
जेव्हा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले व त्यांच्या अन्नपाण्याचीही तरतूद केली.
तेव्हा ईजबेलने एलीयाला दूताकरवी निरोप पाठवला. तो असा, “तू त्या संदेष्ट्यांना मारलेस तसे मी तुला उद्या या वेळेपर्यंत मारणार. यामध्ये मला यश आले नाहीतर देव माझे तसेच व त्याहूनही अधीक करो.”
तेव्हा एलीया अहाबाकडे गेला. अहाबाने एलीयाला पाहिले आणि तो म्हणाला, तुला मी पुन्हा सापडलो. “तू नेहमीच माझ्याविरुध्द आहेस” एलीया म्हणाला, हो, “तुला मी पुन्हा शोधून काढले आहे. तुझे आयुष्य तू परमेश्वराचे अपराध करण्यातच घालवलेस.
तेव्हा इस्राएलच्या राजाने आपल्या एका सेवकाला मीखायाला पकडायचा हुकूम केला. राजा म्हणाला, “याला धरा आणि नगराधिकारी आमोन व राजपुत्र योवाश यांच्याकडे घेऊन जा.
द्रष्ट्याच्या या बोलण्याचा आसास राग आला व क्रोधाच्या भरात त्याने त्यास तुरुंगात डांबले. याच काळात आसा काही लोकांशी फार निर्दयतेने वागला.
पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
होय, त्याकडून तुझ्या सेवकाला चेतावनी मिळते. ते पाळण्याने उत्तम प्रतिफळ मिळते.
दुष्ट मनुष्य त्याचे वेतन मिळविण्यासाठी लबाड बोलतो, परंतु जो नीतीने पेरतो त्याचे वेतन सत्याची कापणी असते.
“तुझ्या लोकांस मी शिक्षा केली ती व्यर्थ झाली आहे. त्यांनी शिस्त स्विकारली नाही, नाश करणाऱ्या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या भविष्यावाद्यांना खाऊन टाकले.”
परंतू राजा यहोयाकीम, त्याचे सर्व सैन्य व अधिकाऱ्याने हे वचन ऐकले आणि यहोयाकीम राजा उरीयाला मारु इच्छित होता, हे उरीयाला समजल्यावर तो घाबरला व मिसर देशात पळाला.
‹जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.›
‹जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.›
‹जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले.›
¶ ‹त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.›
‹तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या संदेष्ट्यासाठी तुम्ही कबरा बांधता.›
ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.
¶ मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते.
जे बी पेरतात व पाणी घालतात ते एक आहेत आणि प्रत्येकाला आपआपल्या श्रमाप्रमाणे आपआपली मजूरी मिळेल.
¶ तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
¶ माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना.