TSK

TSK · मीखा 2:4

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक,

¶ बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.

¶ शौल आणि त्याचा पुत्र योनाथान यांना उद्देशून दावीदाने एक विलापगीत म्हटले.

यिर्मयाने योशीया प्रीत्यर्थ शोकगीते लिहिली आणि गायिली. ती विलापगीते आजही इस्राएलचे स्त्रीपुरुष गातात. योशीयाची ही गीते निरंतर गाण्याचा त्यांनी ठरावच केला. विलापगीताच्या पुस्तकात ही लिहिलेली आहेत.

¶ नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला,

बाबेलाच्या राजा विरूद्धचे हे टोचणारे गाणे तू म्हणशील, “जाचणाऱ्याचा कसा नाश झाला आहे, गर्विष्ठाचा त्वेष संपला.

परमेश्वरा, तू आम्हास तुझ्यापासून मार्गातून का बहकू देतोस आणि तुझ्या आज्ञा न पाळाव्यात म्हणून तू आमचे हृदये कठीण का करतोस? तुझ्या सेवकाकरिता परत ये, जे तुझ्या वतनाचे वंश आहेत.

मी डोंगरासाठी आकांत व विलाप करीन आणि मी कुरणांसाठी शोकगीत गाईन. कारण ती जाळून टकली आहे, तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही. त्यांना गुरांचा आवाजही ऐकू येत नाही. आकाशातील पक्षी आणि प्राणी दूर निघून गेले आहेत.

सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “या गोष्टींचा विचार करा. प्रेतयात्रेच्या वेळी रडणाऱ्यांना बोलवा, त्यांना येऊ द्या. आक्रंदणात कुशल असलेल्या स्त्रियांना बोलवा, त्यांना येऊ द्या.

म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.

तो माझ्या पुढे लांबवर पसरत आला; त्यांच्या मागे पुढे दुःख, आकांताचा लेख लिहिलेला होता.

जशी कुमारी गोणताट नेसून आपल्या तरुणपणाच्या पतीकरता शोक करते, तसा शोक करा.

इस्राएलाचे घराणे हो, हे वचन जे विलापासारखे आहे, असे तुमच्याकडे आणतो ते ऐका.

मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो, मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन, जे तुमचा ताबा घेतील. इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.

सर्वच लोक त्याच्या विरुद्ध बोधकथा घेणार नाहीत काय, आणि त्यास म्हणीने टोमणे मारतील व म्हणतील. जो आपले नाही ते वाढवतो, त्यास हाय हाय! कारण किती वेळ तू घेतलेल्या प्रतिज्ञांचा बोजा वाढवशील?

मग ते येशूला अटक करण्याचा मार्ग शोधू लागले. परंतु त्यांना लोकांची भीती वाटत होती. त्यास अटक करण्याची त्यांची इच्छा होती कारण त्यांना माहीत होते की, हा दाखला त्याने त्यांनाच उद्देशून सांगितला होता. मग ते त्यास सोडून निघून गेले.