TSK

TSK · मीखा 3:1

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

म्हणून मी तुम्हास सांगितले, आपापल्या वंशातून अनुभवी, ज्ञानी व समंजस व्यक्तींची निवड करा. मी त्यांना तुमचे प्रमुख म्हणून नेमतो.”

तसेच त्याने यहूदामध्ये आणि यहूदाच्या प्रत्येक तटबंदीच्या नगरांत न्यायाधीश नेमले.

जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत?

सदोमाच्या अधिकाऱ्यांनो, परमेश्वराचा वचन ऐका; गमोराच्या लोकांनो आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे लक्ष्य द्या.

तेव्हा मी म्हणालो, “खचित ते गरिब आहेत. ते मूर्ख आहेत, कारण त्यांना परमेश्वराचा मार्ग व आपल्या देवाचा नियम माहीत नाही.

ऐका आणि लक्ष द्या, गर्विष्ठ बनू नका, कारण परमेश्वर तुमच्याशी बोलला आहे.

¶ पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.

याजकांनो! हे ऐका, इस्राएलाच्या घराण्या लक्ष दे, हे राजघराण्या ऐक, तुम्हा सगळ्यांचा न्याय होणार आहे तुम्ही मिस्पावर पाश आणि ताबोरावर पसरलेले जाळे झाले आहात.

जे सीयोनमध्ये आरामात आहेत त्यांना, आणि जे शोमरोनाच्या पर्वतावर सुरक्षीत आहेत त्यांना हायहाय, जे राष्ट्रांतील प्रसिद्ध लोक आहेत, ज्यांच्याकडे इस्राएलाचे घराणे धाव घेते त्यांना, हायहाय.

तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय?