माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.
TSK
TSK · मीखा 6:2
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वरा, तुझ्या धमकीच्या आवाजात तू बोललास तेव्हा तुझ्या नाकपुड्यातील सोसाट्याच्या श्वासाने समुद्राचे पाणीही मागे हटले. समुद्राचा तळ दिसू लागला, पृथ्वीचा पाया उघडा पडला.
जेव्हा त्याने सागराच्या पाण्याला सीमाबध्द केले तेव्हा ही मी होते. पाण्याने त्याच्या आज्ञेच उल्लंघन करून पसरू नये, आणि जेव्हा त्याने आज्ञा केली पृथ्वीचा पाया जेथे असायला पाहिजे तेथे मी होते.
परमेश्वर न्याय करण्याकरिता न्यायसभेत उभा राहिला आहे, त्याच्या लोकांचा न्याय करण्याकरिता तो उभा राहिला आहे.
जे घडले त्याची मला आठवण दे. आपण परस्पर वाद करू; तू न्यायी सिद्ध व्हावे म्हणून तू आपला वाद पुढे मांड.
“तर तुम्ही माझ्यावर का आरोप लावता की मी काही वाईट केले आहे? तुम्ही सर्वांनी माझ्याविरूद्ध पाप केले आहेत,” असे परमेश्वर म्हणतो.
परमेश्वर असे म्हणतो, जर फक्त उंचात उंच आकाशाचे मोजमाप करणे शक्य असेल, आणि जर फक्त पृथ्वीच्या खालचे पाये शोधून काढता येऊ शकतील, तर मीही इस्राएलाच्या सर्व वंशजांनी जे सर्व काही केले आहे त्यामुळे त्यांना नाकारीन, असे परमेश्वर म्हणतो.
इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका, या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे; कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली, आणि तरुणपणी देवासोबत झोंबी केली.