¶ त्या दिवसात मिसरातून अश्शूराकडे महामार्ग होईल आणि अश्शूरी मिसरात व मिसरी अश्शूरात येईल; आणि मिसरी अश्शूऱ्यांच्या बरोबर उपासना करतील.
TSK
TSK · मीखा 7:12
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मी उत्तरेला म्हणेन, त्यांना देऊन टाक; आणि दक्षिणेला म्हणेन, कोणालाही मागे धरून ठेवू नको; माझे मुले दुरून आणि माझ्या मुलींना पृथ्वीच्या दूर सीमेपासून आण.
तुझ्या सभोवती पाहा! ते सर्व एकत्र जमतात आणि तुझ्याकडे येतात. तुझी मुले दूरुन येतील आणि तुझ्या मुलींना कडेवर बसून आणतील.
त्या दिवसात यहूदाचे घराणे इस्राएलाच्या घराण्यासोबत चालेल. उत्तरेकडच्या प्रदेशातून ते गोळा होऊन येतील व मी त्यांच्या पूर्वजांना दिलेल्या भूमीत ते येतील.
पाहा, मी त्यांना उत्तरेकडच्या देशातून आणीन, पृथ्वीच्या अगदी शेवटच्या ठिकाणाहून मी त्यांना एकत्र करीन. त्यांच्यामध्ये आंधळे आणि पंगू, गर्भवती आणि ज्या कोणी त्यांच्या प्रसूतीची वेळ आली असेल त्याही त्यांच्याबरोबर असतील. त्यांची मोठी मंडळी इकडे परत येईल.
मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन.